भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांचे वडील हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी सकाळी कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे. बडोद्याचा कर्णधार क्रृणाल पांड्यानं वडिलांच्या अंत्यविधीसाठी बायो बबलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर तो मुश्ताक अली स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. यंदाच्या सत्रात तीन सामन्यात क्रृणालने बडोद्याचं संघाचं नेतृत्व केलं.
बडोदा क्रिकेट असोसिएशनने मुख्य कार्यकारी आधिकारी शिशिर हटंगडी यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआयशी बोलताना शिशिर हटंगडी म्हणाले की, वैयक्तिक कारणामुळे क्रृणाल पांड्या बायो बबलमधून बाहेर गेला आहे. त्याच्या दुखात सहभागी आहोत.
Krunal, Hardik Pandya’s father passes away, Baroda skipper leaves Syed Mushtaq bubble
Read @ANI Story | https://t.co/4cQSG6kyM7 pic.twitter.com/9FAsjGmFwI
— ANI Digital (@ani_digital) January 16, 2021
सय्यद मुश्तक अली टॉफ्रीमध्ये क्रृणाल पांड्यानं तीन सामन्यात चार बळी घेतले आहेत. तसेच पहिल्या सामन्यात महत्वाची ७६ धावांची खेळीही केली होती. क्रृणाल पांड्याच्या नेतृत्वात बडोद्यानं आतापर्यत तिनही सामने जिंकले आहेत. ग्रुप सी मध्ये बडोद्याचा संघ सध्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने सय्यद अली स्पर्धेत सहभाग घेतला नाही.आगामी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी हार्दिक पांड्या तयारी करत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 16, 2021 9:50 am