युवा खेळाडू अन्सू फाटी याने पुन्हा एकदा गोल करत बार्सिलोनाच्या विजयात मोलाचा हातभार लावला. बार्सिलोनाने सेल्टा व्हिगोचा ३-० असा पाडाव करत ला-लीगा फुटबॉलमधील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

पहिल्या सत्राआधी क्लेमेंट लेंगलेट याला पंचांनी लाल कार्ड दाखवल्यामुळे बार्सिलोनाला १० जणांसह खेळावे लागले; पण बार्सिलोनाने या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. लिओनेल मेसीनंतर बार्सिलोनाचे भवितव्य समजल्या जाणाऱ्या फाटीने ११व्या मिनिटालाच बार्सिलोनाचे खाते खोलले. फिलिपे कु टिन्होने दिलेल्या पासवर फाटीने चेंडूला गोलजाळ्याची दिशा दाखवली. त्यानंतर लुकास ओलाझाचा (५१व्या मिनिटाला) स्वयंगोल आणि सर्जी रॉबेटरे याने केलेल्या गोलमुळे बार्सिलोनाने विजय साकारला.

युरोपा लीग फुटबॉल

मिलानचा पेनल्टी-शूटआऊटमध्ये विजय

एसी मिलानने पोर्तुगालमधील रिओ अवे क्लबवर पेनल्टी-शूटआऊटमध्ये ९-८ अशी मात करत युरोपा लीगच्या गटसाखळीत प्रवेश के ला आहे. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत सुटला होता. दरम्यान, युरोपा लीगची गटवारी शुक्रवारी जाहीर झाली असून सात वेळा विजेत्या मिलानला ह गटात सेल्टिक, स्पार्टा प्राग आणि लिले यांचा सामना करावा लागेल. आर्सेनलच्या गटात रॅपिड व्हिएन्ना, मोल्डे आणि दंडाल्क यांचा समावेश असेल.

लीग चषक फुटबॉल

आर्सेनल उपांत्यपूर्व फेरीत गोलरक्षक बर्नाड लेनो याने पेनल्टी-शूटआऊटमध्ये के लेल्या कामगिरीमुळे आर्सेनलने लिव्हरपूलचा ५-४ असा पराभव करत लीग चषक फु टबॉलच्या उपांत्यपूर्व फे रीत मजल मारली. निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरी झाल्यानंतर जो विलॉक याने अखेरच्या पेनल्टीवर गोल करत आर्सेनलला विजय मिळवून दिला.