भारत व बांगलादेश दोन्ही संघांसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत आजचा सामना जिंकला तर उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करेल मात्र त्यामुळे बांगलादेश स्पर्धेबाहेर जाईल. उलट बांगलादेश आज विजयी झाला तर भारतासाठी श्रीलंकेविरोधातला सामना करो वा मरो अशा स्वरूपाचा असेल तर बांगलादेशाचे उपांत्य फेरीतील प्रवेशाचे दरवाजे उघडे राहतील. या महत्वाच्या सामन्यामध्ये चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर आहे. मागील सामन्यामध्ये विश्वचषक स्पर्धेत ऋषभ पंतला पहिल्यांदाच संधी देण्यात आली होती. मात्र भारताचा या सामन्यामध्ये पराभव झाला होता. तसेच या सामन्यात पंतला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे आजच्या सामन्यात पंतला संधी दिली जाणार की इतर कोणी संघात दिसणार यासंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहे. मात्र लोकसत्ता ऑनलाइनने घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये ७५ टक्के वाचकांनी पंतला आज भारतीय संघात स्थान मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

फेसबुक पोल

ट्विटर पोल

दरम्यान पंतबरोबर या सामन्यामध्ये केदार जाधव ऐवजी रविंद्र जाडेजालाही संधी देण्यात यावी असंही नेटकऱ्यांनी ट्विटवर इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर म्हटले होते. त्यामुळे आजच्या अंतीम ११ खेळाडूंमध्ये कोणा कोणाची वर्णी लागणार हे पुढील काही तासामध्ये समोर येईल.