News Flash

वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे मोहम्मद सलाह अडचणीत

सलाह तसेच क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच त्याबाबत नियमानुसार कारवाई केली जाईल,

| August 15, 2018 02:04 am

मोहम्मद सलाह

लंडन : वाहन चालवताना मोबाइलद्वारे संभाषण केल्यामुळे लिव्हरपूल क्लबकडून खेळणारा इजिप्तचा फुटबॉलपटू महम्मद सलाह अडचणीत सापडला आहे. लिव्हरपूल क्लबकडूनच याबाबतचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पोलिसांकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. सलाह तसेच क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरच त्याबाबत नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याच्यावर साधारणपणे एक हजार युरोच्या दंडाची कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्या वाहन परवान्यावर या गुन्ह्य़ाबाबत नोंद केली जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:04 am

Web Title: mohamed salah in trouble because of breaking the traffic rules
Next Stories
1 ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते घडवण्याचे लक्ष्य!
2 आशियाई सुवर्णपदक विजेते हकम सिंग यांचे निधन
3 पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छा देणाऱ्या ट्विटरकराला सानिया मिर्झाचं सडेतोड उत्तर
Just Now!
X