06 March 2021

News Flash

सिराजचे वडील चालवायचे रिक्षा, आता मुलानं घरासमोर उभी केली BMW

सिराजनं घेतली नवीकोरी BMW

अजिंक्‍य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं यजमान ऑस्ट्रेलियाचा २-१ च्या फरकानं पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताच्या युवा बिग्रेडने ऑस्‍ट्रेलियात कमाल केली. वाशिंगटन सुंदर, टी नटराजन, मोहम्‍मद सिराज आणि शार्दुल ठाकूरसारख्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं. सिराजसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा अविस्मरणीय ठरला.

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद सिराजच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतरही सिराजनं ऑस्ट्रेलियातच थांबण्याचा निर्णय घेत वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम सिराजनं केला. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर सिरजानं स्वत:ला बीएमड्यू गाडी भेट केली आहे.

शुक्रवारी मोहम्मद सिराजनं आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर BMW गाडीचा व्हिडीओ पोस्ट केला. मोहम्मज सिराजचे वडील रिक्षा चालवत होते. रिक्षा चालवून त्यांनी सिराजचं क्रिकेटचं स्वप्न पूर्ण केलं. आज, सिराजनं घरासमोर BMW गाडी उभा केली आहे. मात्र, वडील सोबत नाहीत.

सिराजच्या वडिलांनी रिक्षा चालवून सिराजचे क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न साकारले. रणजी हंगामात हैदराबादकडून ४१ बळी घेतल्यामुळे तो प्रकाशझोतात आला. त्यामुळे दोन कोटी ६० लाख रुपयांची बोली लावत सनरायजर्स हैदराबादने संघात स्थान दिले होते. आता आयपीएलमध्ये आरसीबी संघातून खेळत आहे. सिराजची चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड झाली होती. ऑस्ट्रेलियात त्यानं १३ बळी घेत आपली निवड सार्थ ठरवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 11:06 am

Web Title: mohammed siraj gifts himself a bmw car after returning from memorable australia tour nck 90
Next Stories
1 ऑस्ट्रेलियातून परतल्यानंतर शुबमननं यशाचं श्रेय दिल युवराजला; म्हणाला…
2 खुलासा: वॉशिंग्टन सुंदरकडे खेळण्यासाठी नव्हते पॅड्स, सामना सुरू झाल्यानंतर गेला दुकानात आणि…
3 लोकलमध्ये सीट मिळवणं, कांगारुंच्या गोलंदाजीचा सामना करण्यापेक्षा अवघड – शार्दुल ठाकूर
Just Now!
X