03 March 2021

News Flash

महेंद्रसिंह धोनीचा भारतीय महिलांना विजयी कानमंत्र

प्रत्येक भारतीयाला तुमच्या खेळाचा अभिमान

महेंद्रसिंग धोनी ( संग्रहीत छायाचित्र)

ऑस्ट्रेलियावर मात करुन महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या मिताली राजच्या टीम इंडियाचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. अंतिम सामन्याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने महिलांच्या संघाला विजयासाठी खास कानमंत्र दिला आहे.

” जर आम्ही जिंकलो किंवा हरलो तर पुढे काय होईल याचा अजिबात विचार करु नका. तुम्ही आतापर्यंत खूप चांगला खेळ करत आला आहात. कोणततरी एक गोष्ट तुम्हाला आज विजय मिळवून देईल. कदाचीत एखादा झेल, एखादा रन आऊट, एखाद्या खेळाडूची सुरेख गोलंदाजी कोणतीही बाब तुम्हाला विजय मिळवून देईल. त्यामुळे शांत राहून खेळ केला तर आपला विजय नक्की आहे ”, असं महेंद्रसिंह धोनी म्हणाला. चेन्नईत सुरु असलेल्या तामिळनाडू प्रिमीअर लिग स्पर्धेच्या उद्घाटनावेळी धोनी बोलत होता.

अंतिम सामन्यात भारतीय महिलांचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या धावगतीला वेसण घातली आहे. त्यामुळे या सामन्यात मिताली राजचा भारतीय संघ कशी कामगिरी करतो हे पहावं लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 6:09 pm

Web Title: ms dhoni shares tips with mitali raj to how final matches win
Next Stories
1 अंतिम सामन्याआधीच महिला क्रिकेट टीमसाठी गुड न्यूज! बक्षीसांचा पाऊस सुरूच
2 मितालीचा ‘कुल’ अंदाज भारतासाठी फायदेशीर ठरेल; मोदींचे प्रत्येक खेळाडूसाठी खास ट्विट
3 हरमनप्रीतला रोखण्यासाठी इंग्लंडला माजी कर्णधार नासिर हुसेनने दिलाय ‘हा’ मंत्र
Just Now!
X