भारतीय क्रिकेटने अनेक कर्णधार पाहिले. अगदी विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देव यांच्यापासून ते भारताला निर्भीडपणे खेळायला शिकवणाऱ्या सौरव गांगुलीपर्यंत, याष्ट्यांमगे उभे राहून खेळाचा अचूक अंदाज घेणाऱ्या महेंद्रसिंग धोनीपासून ते आधुनिक क्रिकेटचा किंग मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीपर्यंत .. सगळ्यांनी भारतीय क्रिकेटला खूप काही दिले. प्रत्येकाच्या स्वभावाची वेगवेगळी वैशिट्ये होती. म्हणूनच भारतीय क्रिकेट संघ हळूहळू ‘टीम इंडिया’ झाली.

“धोनीलाच क्रिकेटपासून दूर राहायचं होतं”; माजी निवडकर्त्यांचे स्पष्टीकरण

भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याने बरीच वर्षे क्रिकेट खेळले. गांगुली, धोनी आणि विराट असे तिघांच्या नेतृत्वाखाली क्रिकेट खेळलेले खूप कमी लोक आहेत. त्यात नेहरा हा एक आहे. म्हणूनच नेहराला तिन्ही कर्णधारांचे मैदानावरील स्वभाव माहिती आहेत. नुकतेच समालोचक आकाश चोप्रा यांच्या आकाशवाणी कार्यक्रमात नेहराने मुलाखत दिली. त्यावेळी नेहराने अनेक प्रशांची उत्तरे दिली. या मुलाखतीत बोलताना नेहराने सौरव गांगुली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या मैदानावरील स्वभावातील एक साम्य सांगितलं.

sourav ganguly

“… तर क्रिकेट विश्वचषक खेळलाच पाहिजे”

“धोनी आणि गांगुली हे दोघे अतिशय भिन्न स्वभावाचे कर्णधार होते. पण दोघांमध्ये एक साम्य होते. ते साम्य म्हणजे दोन्ही कर्णधारांकडे संघातील खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याचे कसब होते. गांगुलीने जेव्हा कर्णधारपद स्वीकारलं तेव्हा संघ नवीन होता. याउलट धोनीने नेतृत्व स्वीकारलं, तेव्हा संघात अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी खेळाडू होते. त्यांना नीटपणे हाताळणे ही धोनीपुढील कसोटी होती. गांगुली कर्णधार झाला, तेव्हा भारतीय संघ मॅच फिक्सिंगच्या वादात अडकला होता. तेव्हा २००१ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या दौऱ्यात जेव्हा भारत विजयी झाला तेव्हा गांगुलीचे नेतृत्वकौशल्य सिद्ध झाले”, असं नेहरा म्हणाला.

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

“धोनीच्या कर्णधारपदाबाबत बोलायचे तर तो खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा कर्णधार होता. त्याच्या डोक्यात खेळाचे गणित तयार असायचे. तो दुसऱ्या खेळाडूंना अधिक संधी द्यायचा. सचिन, सेहवाग, द्रविड आणि लक्ष्मण या खेळाडूंना त्याने ज्या प्रकारे संघात हाताळले, त्यावरूनच त्याची कर्णधारपदाची कारकीर्द यशस्वी होईल असं मला वाटलं होतं आणि ते खरं ठरलं”, असं नेहराने स्पष्ट केलं.