News Flash

नदाल गोल्फच्या मैदानावर

नदाल चक्क व्यावसायिक गोल्फ स्पर्धेत सहभागी झाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

 

अव्वल टेनिसपटू राफेल नदालने टेनिस रॅकेटऐवजी गोल्फचे साहित्य हातात घेत पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. नदाल हा एक चांगला गोल्फपटूदेखील आहे हे अनेकांना ठाऊक आहे. मात्र यावेळेस नदाल चक्क व्यावसायिक गोल्फ स्पर्धेत सहभागी झाला होता.

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा विक्रमी १३वेळा जिंकल्यावर स्पेनच्या राफेल नदालने स्पेनमधील मॅर्लोका येथील व्यावसायिकांच्या गोल्फ स्पर्धेत नुकताच सहभाग घेतला. नदाल त्याच्या गोल्फचे साहित्य (क्लब) हेदेखील टेनिस रॅकेटप्रमाणेच हाताळतो हे पाहायला मिळाले. पहिल्याच दिवशी नदालने ६० जणांचा समावेश असलेल्या स्पर्धेत संयुक्तपणे १०वे स्थान मिळवले होते. नदालचा गोल्फ मैदानावरील वावर हा एखाद्या व्यावसायिक गोल्फपटूप्रमाणेच होता.

नदाल गोल्फ खेळत असल्याने साहजिकच मॅर्लोका येथील गोल्फ स्पर्धेला अचानक महत्व प्राप्त झाले. गोल्फमध्ये जवळच्या अंतराप्रमाणेच दूरवर चेंडूचा फटका बसणे आवश्यक असते. नदालने त्यातही त्याची गुणवत्ता दाखवली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 12:25 am

Web Title: nadal on the golf course abn 97
Next Stories
1 जोकोव्हिच आणि नदाल यांच्यात अग्रस्थानासाठी चुरस
2 जॉन्सनचा नैराश्याविरुद्ध संघर्ष कायम
3 Fact Check : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी न मिळाल्यानंतर रोहितने ट्विटर Bio बदलला?? काय आहे सत्य…
Just Now!
X