भारताचा युवा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेशने ‘कँडिडेट्स’ स्पर्धेत ऐतिहासिक जेतेपद पटकावल्यापासून देश-विदेशातील बुद्धिबळप्रेमींना जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीचे वेध लागले आहेत. या लढतीत १७ वर्षीय गुकेश विद्यमान जगज्जेता चीनच्या डिंग लिरेनसमोर जगज्जेतेपदासाठी आव्हान उपस्थित करेल. ही लढत नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये खेळवण्याची जागतिक बुद्धिबळ संघटनेची (फिडे) योजना आहे. भारत यजमानपदासाठी उत्सुक असला, तरी या लढतीच्या यजमानपदाबाबत सध्या बराच वाद सुरू आहे. असे का घडत आहे आणि यजमानपदासाठी कोणते देश शर्यतीत आहेत, याचा आढावा.

यजमानपदासाठी किती रकमेची बोली?

जागतिक अजिंक्यपद लढतीचे यजमानपद भूषविण्यास इच्छुक असलेल्या देशांना ‘फिडे’ने निविदा सादर करण्यास सांगितले आहे. यजमानपद मिळवायचे झाल्यास किमान ८५ लाख अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे ७० कोटी रुपयांची बोली ‘फिडे’ला अपेक्षित आहे. यात बक्षिसाच्या रकमेचा समावेश असून ‘फिडे’ ११ लाख डॉलर म्हणजे अंदाजे ९ कोटी रुपये इतकी रक्कम आपल्याकडेच ठेवणार आहे.

marriage certificate
नोंदणी केलेली नसल्यास विवाह अवैध ठरतो का?
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Baroda Dynamite Case George Fernandes Tihar jail 1977 Lok Sabha election
आणीबाणी, बॉम्बस्फोट आणि तुरुंगातून लढवलेली निवडणूक; जॉर्ज फर्नांडिस कसे जिंकले?
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
history of shawarma Mumbai teen dies after eating shawarma, 2 vendors arrested
विश्लेषण: अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा शोर्मा भारतात कुठून आला?
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
d gukesh
अग्रलेख: महाराष्ट्र ‘दीन’!
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?

हेही वाचा : बँकाच निघाल्या सायबर चोरांच्या मागावर… काय असेल ही क्रांतिकारी यंत्रणा?

अपेक्षित रकमेवरून वाद का?

जागतिक अजिंक्यपद लढतीचे यजमानपद मिळवण्यासाठी ‘फिडे’ला अपेक्षित असलेल्या रकमेवरून बुद्धिबळविश्वात बराच वाद निर्माण झाला आहे. इतक्या रकमेचे ‘फिडे’ काय करणार, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय मास्टर असलेला बुद्धिबळपटू लेवी रोझमनने उपस्थित केला आहे. रोझमन ‘गॉथमचेस’ या नावाने समाजमाध्यमावर सक्रिय असतो. ‘‘८५ लाख अमेरिकन डॉलर कशासाठी? त्यातील ११ लाख डॉलर ‘फिडे’साठी राखीव. या रकमेचे ‘फिडे’ काय करणार? खेळाडूंना २५ लाख डॉलर मिळणार आहेत. मग उर्वरित ४९ लाख डॉलर कुठे जाणार?’’ असे विविध प्रश्न रोझमनने उपस्थित केले आहेत. ‘बुद्धिबळातही प्रसारण हक्कांचे करार असायला हवेत. तसेच समाजमाध्यम प्रभावकांचाही (इन्फ्लुएन्सर्स) बुद्धिबळाच्या प्रसारासाठी अधिक चांगला उपयोग करता येऊ शकतो. प्रचलित असलेल्या संयोजकांना बुद्धिबळाशी जोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तसे झाल्यास विश्वातील आघाडीच्या बुद्धिबळपटूंना अधिक आर्थिक साहाय्य मिळू शकेल,’’ असे मतही रोझमनने मांडले.

फिडेसाठी पैसे मिळवण्याचे साधन?

त्याचप्रमाणे डेन्मार्कचा ग्रँडमास्टर पीटर हेनी निल्सननेही इतक्या मोठ्या रकमेवरून ‘फिडे’वर टीका केली आहे. जागतिक अजिंक्यपद लढतीपेक्षा मोठे आणि प्रतिष्ठेचे बुद्धिबळात काहीच नाही. मात्र, ही लढत आता केवळ ‘फिडे’साठी पैसे मिळवण्याचे साधन झाली आहे, असे निल्सन म्हणाला. तसेच यजमानपद मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या देशांकडून मोठी रक्कम मागितली जात असतानाच, बक्षिसाच्या रकमेत मात्र वर्षागणिक घट झाल्याचे समोर येत असल्याचेही त्याने निदर्शनास आणले आहे. या टीकेनंतर ‘फिडे’ला उत्तर देणे भाग पडले.

हेही वाचा : मुखाचा कर्करोग ठरतोय भारतीय तरुणांसाठी घातक… जीडीपीवर होतोय विपरीत परिणाम? काय सांगते ताजे संशोधन?

‘फिडे’कडून कोणते स्पष्टीकरण?

‘फिडे’चे महाव्यवस्थापक ग्रँडमास्टर एमिल सुतोव्स्की यांनी मोठ्या रकमेबाबत स्पष्टीकरण दिले. ‘‘बुद्धिबळातील सर्वांत मोठ्या स्पर्धा आणि लढतींमधून सर्वाधिक महसूल मिळवण्याचा आमचा प्रयत्न असतो. यात काहीच गैर नाही. सर्वच खेळांमध्ये हे घडते. यजमानपदासाठीच्या एकूण रकमेतील १०-१२ टक्के रक्कम केवळ ‘फिडे’ला मिळणे योग्यच आहे,’’ असे सुतोव्स्की म्हणाले. जागतिक अजिंक्यपद लढत आणि ऑलिम्पियाड यातून सर्वाधिक महसूल मिळवण्याची ‘फिडे’ला संधी असते. या महसुलाशिवाय आम्हाला बुद्धिबळ स्पर्धांचे आयोजन, तसेच आमच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे महिनाभरासाठी एखादे हॉटेल किंवा जागा बूक करणे हे खूप खर्चीक असते. तांत्रिक बाबींचाही आम्हाला विचार करावा लागतो. फसवणूक (चिंटिंग) विरोधी धोरण, सामन्यांचे प्रसारण या सगळ्याचा विचार करूनच आम्ही इतक्या मोठ्या रकमेची मागणी केल्याचे सुतोव्स्की यांनी सांगितले.

हेही वाचा :  विश्लेषण: विदर्भ भूकंपप्रवण नाही, तरीही भूकंपाचे सौम्य धक्के का?

यजमानपदासाठी भारत शर्यतीत?

गुकेशने ‘कँडिडेट्स’ स्पर्धा जिंकल्यानंतर अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (एआयसीएफ) जगज्जेतेपदाच्या लढतीचे यजमानपद भूषवण्यात आपल्याला रस असल्याचे स्पष्ट केले होते. ‘फिडे’ला अद्याप कोणत्याही देशाने अधिकृत निविदा सादर केली नसली, तरी काही देशांशी आपली चर्चा झाल्याचे सुतोव्स्की यांनी सांगितले. ‘‘अर्जेंटिना, भारत आणि सिंगापूर यांच्याशी आमची चर्चा झाली आहे,’’ असे सुतोव्स्की म्हणाले. दरम्यान, सौदी अरेबियाही जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीचे आयोजन करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सध्या तरी साैदी यजमानपदाच्या शर्यतीत नसल्याचे आणि त्यांच्याशी आपली चर्चा न झाल्याचे सुतोव्स्की यांनी स्पष्ट केले. इच्छुक देशांना निविदा सादर करण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर ‘फिडे’ जूनमध्ये यजमानपदाबाबत अंतिम निर्णय घेणे अपेक्षित आहे.