27 September 2020

News Flash

नाना पाटेकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी

प्रसिद्ध अभिनेता आणि अव्वल नेमबाजपटू नाना पाटेकर गुरगाव, नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय खुल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला.

| February 18, 2014 03:46 am

प्रसिद्ध अभिनेता आणि अव्वल नेमबाजपटू नाना पाटेकर गुरगाव, नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय खुल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी झाला. कर्दापुरच्या सीआरपीएफ अकादमीच्या प्रांगणात ही स्पर्धा सुरू आहे. बिग बोअर प्रकारात नानाने आपले कौशल्य आजमावले. नानाव्यतिरिक्त ऑलिम्पिक पदक प्राप्त गगन नारंगही या स्पर्धेत खेळत आहे. स्पर्धेच्या नेटक्या आयोजनाने भारावून गेल्याचे नानाने पत्रकारांशी सांगितले. गुरगावसारख्या मध्यवर्ती ठिकाणी ही स्पर्धा देशभरातल्या नेमबाजपटूंना आकर्षित करेल यात शंकाच नाही. युवा खेळाडूंनी मोठय़ा संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, अशी सूचना नानाने केली. देशभरातले ६०० नेमबाजपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 3:46 am

Web Title: nana patekar participates in national open shooting championship
टॅग Nana Patekar
Next Stories
1 एटीपी चॅलेंजर स्पर्धा उपयुक्त!
2 संघाने चांगली कामगिरी केली- धोनी
3 अखेर सोची ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकला!
Just Now!
X