३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडने सर्वात प्रथम आपला संघ जाहीर केला आहे. १५ जणांच्या या संघाचं नेतृत्व साहजिकपणे केन विल्यमसनकडे देण्यात आलेलं आहे. न्यूझीलंडच्या संघात सर्व अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आलेली असून, नवोदीत टॉम ब्लंडेललाही संघात जागा देण्यात आलेली आहे. विश्वचषकात न्यूझीलंडचा पहिला सामना १ जून रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे.

विश्वचषकासाठी असा असेल न्यूझीलंडचा संघ –

केन विल्यमसन (कर्णधार), मार्टीन गप्टील, हेन्री निकोलस, रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, टॉम ब्लंडेल, कॉलिन डी-ग्रँडहोम, मिचेल सँटनर, जिमी निशम, इश सोधी, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट