29 March 2020

News Flash

US Open 2018 Men’s Final : जोकोव्हीचचे सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद; हंगामाचा शेवट गोड

यंदाच्या हंगामातील सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले.

US Open 2018 Men’s Final : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हीचने स्पर्धेच्या अंतिम फेरीत अर्जेंटिनाच्या जुआन डेल पोत्रोला ६ – ३, ७- ६(७-४), ६ – ३ असे पराभूत केले आणि यंदाच्या हंगामातील सलग दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा ही २०१८च्या हंगामातील अंतिम ग्रँडस्लॅम स्पर्धा होती. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावून जोकोव्हीचने हंगामाचा शेवट गोड केला.

जोकोव्हीचने उपांत्य फेरीत निशीकोरीला ६-३, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर जुआन डेल पोत्रोने नदालला कडवी झुंज दिली होती. स्टार खेळाडू राफेल नदाल याला उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. मात्र सामना थांबवण्यात आला तेव्हा पोत्रो ७-६(७-३), ६-२ अशा आकडेवारीसह पुढेच होता. परंतु ही विजयी लय त्याला अंतिम सामन्यात राखता आली नाही आणि त्याला जोकोव्हीचपुढे हार पत्करावी लागली.

जोकोव्हीचने यंदाचे विम्बल्डन विजेतेपदही आपल्या नावे केले होते. त्याने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या केविन अँडरसन याला धूळ चारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 6:25 am

Web Title: novak djokovic vs juan martin del potro us open 2018 final
Next Stories
1 एकेरीत समीर वर्मा, दुहेरीत रान्किरेड्डी-शेट्टी अजिंक्य
2 सेरेनाकडून बेशिस्त वर्तन
3 ऑलिम्पिकमध्ये कसर भरून काढेन!
Just Now!
X