पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने वैयक्तिक कारणास्तव पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) यंदाच्या पर्वातून माघार घेतली आहे. तो पीएसएलमध्ये इस्लामाबाद युनायटेडकडून खेळत आहे. हसन लवकरच अबुधाबीमधील बायो-बबल सोडून पाकिस्तान परत येईल. इस्लामाबाद युनायटेडचा आठ गुणांसह गुणतालिकेत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

हसन अली म्हणाला, “मला इस्लामाबाद युनायटेडच्या सर्व चाहत्यांना सांगायचे आहे, की दुर्दैवाने वैयक्तिक कारणास्तव मला पीएसएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडावे लागत आहे. क्रिकेटपेक्षा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुटुंबापेक्षा महत्वाचे काहीही नाही. इस्लामाबाद युनायटेडच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. ही टीम खरोखरच एक असे कुटुंब आहे, जे सर्व कठीण काळात आपल्या पाठीशी उभे आहे. पीएसएलच्या उर्वरित सामन्यांसाठी मी संघाला शुभेच्छा देतो.”

हेही वाचा – कभी आगे तू कभी पीछे मै..! स्कॉटलंडहून मागवलेल्या घोड्यासह ३९ वर्षीय धोनीनं लावली शर्यत

 

इस्लामाबाद युनायटेडचा कर्णधार शादाब खानने कबूल केले, की हसनची अनुपस्थिती संघाला नुकसानदायी ठरेल. शादाब म्हणाला, “सध्या आम्हाला हसनची स्थिती समजली आहे, कुटुंब नेहमीच प्रथम येते. आम्ही हसनला शुभेच्छा देतो. इस्लामाबाद युनायटेड संघ नेहमीच कुटूंबाप्रमाणे एकमेकांची काळजी घेतो.”

हेही वाचा – अरेरे…मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तंबूत धाडणारा क्रिकेटर बनलाय टॅक्सी ड्रायव्हर!

हसन अली भारताचा जावई

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली भारताचा जावई आहे. अलीची पत्नी शामिया आरझू ही भारतीय आहे. शामियाचे कुटुंब हरयाणाचे आहे, परंतु सध्या तिचे कुटुंब नवी दिल्ली येथे स्थायिक आहे. हसन अली आणि शामियाचे २०१९मध्ये लग्न झाले.