News Flash

शोएब मलिकनंतर हा पाकिस्तानी क्रिकेटर होणार भारताचा जावई

मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, काय फरक पडतो?

माजी क्रिकेटपटू शोएब मलिकनंतर आणखी एक पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताचा जावई होणार आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली आणि भारतातील शमिया आरझू हे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे हसननेच मंगळवारी कबूल केले. हसनची गतवर्षी दुबईत हरयाणाच्या शमियाशी भेट झाली होती. तेव्हापासून दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्टला दोघांचा विवाह सोहळा होण्याची शक्यता आहे. मात्र आम्ही दोन्ही कुटुंबीयांचे मत विचारात घेतल्यावरच लग्नाची तारीख नक्की करू, असे हसनने सांगितले. भारतीय महिलेशी लग्न करणारा हसन हा पाकिस्तानचा चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे.

हसन अली आणि शमिया आरझू

हरियाणाच्या नूंह भागात राहणारी शामिया आरझू सध्या एअर अमीरातमध्ये फ्लाईट इंजिनिअर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्टला दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे. मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, काय फरक पडतो? फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये गेलेल्या नातेवाईकांशी आमचा आजही संपर्क आहे, असे शामियाचे वडील लियाकत अली यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 8:50 am

Web Title: pakistan cricket star hasan ali set to marry dubai based indian girl nck 90
Next Stories
1 बंदीच्या निर्णयावर पृथ्वी शॉ म्हणतो…
2 सिंधूची माघार; सायनावर मदार!
3 गुजराथीला विजेतेपद
Just Now!
X