24 August 2019

News Flash

२०२० आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडे, बीसीसीआयच्या भूमिकेकडे नजरा

टी-२० स्वरुपात खेळवली जाणार स्पर्धा

संग्रहीत छायाचित्र

२०२० साली होणाऱ्या आशिया चषकाचं यजमानपद आशियाई क्रिकेट परिषदेने पाकिस्तानला दिलं आहे. मात्र ही स्पर्धा पाकिस्तानात होणार की युएईमध्ये हे अजुन स्पष्ट झालेलं नाहीये. बांगलादेशात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. दरम्यान भारत या स्पर्धेत सहभागी होणार की नाही याचा निर्णय अद्याप बीसीसीआयने घेतलेला नाहीये.

“स्पर्धेचं यजमानपद हे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देण्यात आलेलं आहे. आता स्पर्धा कुठे भरवायची हा त्यांचा निर्णय आहे.” आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी ‘द ढाका ट्रिब्युन’ या वृत्तपत्राशी बोलत असताना माहिती दिली. २०२० साली होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी ही स्पर्धा टी-२० स्वरुपात खेळवली जाणार आहे.

First Published on December 14, 2018 5:24 pm

Web Title: pakistan to host 2020 asia cup final venue unclear
टॅग Asia Cup,Pcb