04 March 2021

News Flash

मोहम्मद आमीर पाकिस्तान सोडणार?

मर्यादित क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात मोहम्मद आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे

पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज मोहम्मद आमीरने ब्रिटनच्या व्हिसाची मागणी केली असून तिथेच वास्तव्यास राहण्याचा विचार केला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, आमीरची पत्नी नरगिस मलिका ब्रिटनची नागरिक असून तिने स्पाउस व्हिसासाठी अर्ज केला आहे. पत्नीच्या व्हिसावर आमीर ३० महिन्यापर्यंत इंग्लंडमध्ये राहू शकतो.

पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, आमीर लवकरच इंग्लंडमध्ये वास्तव्यास जाऊ शकतो. सध्या आमीर इंग्लंडमध्ये आलिशान घराच्या शोधात आहे. घराची शोधमोहिम संपल्यानंतर आमीर इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यास राहण्याची शक्यता आहे. तो पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणार की नाही याबाबत अद्याप काहीच समोर आले नाही. मात्र, कसोटी क्रिकेटनंतर आमीर लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारू शकतो. आमीरला ब्रिटनचा व्हिसा आणि नागरिकत्व मिळण्यासाठी एक अडचण येऊ शकतो. काही दिवसांपूर्वी अमिर स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकला होता. त्यावेळी ब्रिटनच्या कोर्टात तो दोषी आढळला होता. त्यामुळे अमिरला व्हिसा मिळण्यास अडचण येऊ शकते.

मर्यादित षटकांच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गेल्या आठवड्यात मोहम्मद आमीरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वन-डे विश्वचषकात आमीरने भेदक मारा केला होता, मात्र आपल्या संघाला उपांत्य फेरी गाठून देण्यामध्ये तो अपयशी ठरला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व करणं हे माझं स्वप्न होतं. आगामी टी-२० विश्वचषकात मी संघाला विजेतेपद मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय आपल्यासाठी सोपा नसल्याचंही आमीरने सांगितलं. यावेळी आमीरने आपल्याला दिलेल्या संधीबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आभार मानले आहेत.

जुलै २००९ साली श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटी सामन्यात आमीरने पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याने ३६ कसोटी सामन्यांत पाकिस्तानचं प्रतिनिधीत्व केलं, या सामन्यांमध्ये आमीरने ३० च्या सरासरीने ११९ बळी घेतले. एप्रिल २०१७ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्जस्टन कसोटीत ४४ धावांत घेतलेले ६ बळी ही आमीरची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी राहिलेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2019 10:44 am

Web Title: pakistani cricketer mohammad amir do not want to play for pakistan nck 90
Next Stories
1 VIDEO: युवराजने पाकिस्तानी गोलंदाजाला लगावला भन्नाट षटकार
2 अनिल कुंबळे आयसीसीचा तो वादग्रस्त नियम बदलणार?
3 बेंगळूरुकडून यू मुंबाचा पराभव
Just Now!
X