24 October 2020

News Flash

फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवीन प्रशिक्षक

२०१९ विश्वचषकापर्यंत सिमन्स यांच्याकडे जबाबदारी

फिल सिमन्स अफगाणिस्तानचे नवे प्रशिक्षक

आयसीसीकडून Test Playing Nations चा दर्जा मिळाल्यानंतर नवोदीत अफगाणिस्तानच्या संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दृष्टीने गंभीरपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू फिल सिमन्स यांची २०१९ च्या विश्वचषकापर्यंत अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. याआधी फिल सिमन्स यांनी वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आयर्लंडच्या संघाला प्रशिक्षण दिलं आहे.

माजी भारतीय खेळाडू लालचंद राजपूत यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांना मुदतवाढ नाकारली. यानंतर बोर्डाने फिल सिमन्स यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवली आहे. सिमन्स ८ जानेवारीपासून आपल्या पदाचा कार्यभार सांभाळतील. सिमन्स आगामी वर्षांत महत्वाच्या स्पर्धा लक्षात घेता आमच्या संघात चांगले बदल घडवू शकतील असा आम्हाला विश्वास आहे. याच कारणांसाठी त्यांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात येत असल्याचं, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शफीक यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 3:03 pm

Web Title: phil simmons named afghanistan coach
Next Stories
1 शास्त्रींमुळे भारतीय खेळाडू अपयशाने घाबरुन जात नाहीत, सहायक प्रशिक्षक संजय बांगरची स्तुतीसुमनं
2 पाकिस्तान सुपर लीगमधील सामन्यांचा दर्जा IPL पेक्षा सरस – अब्दुल रझाक
3 दक्षिण आफ्रिकेतला दुष्काळ भारतीय संघाच्या पथ्यावर??
Just Now!
X