04 March 2021

News Flash

Pro Kabaddi Season 5 – हरियाणाच्या वझीरचा धडाकेबाज खेळ, जयपूर पिंक पँथर्स पराभूत

अ गटात जयपूर दुसऱ्या स्थानावर

वझीर सिंहचे सामन्यात १० बळी

वझीर सिंहचा आक्रमक खेळ आणि त्याला कर्णधार सुरिंदर नाडाने दिलेली साथ या जोरावर हरियाणा स्टिलर्सने जयपूर पिंक पँथर्सवर मात केली आहे. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात जयपूरने ३०-२६ अशा फरकाने जयपूरला पराभवाचा धक्का दिला.

वझीर सिंहने आपल्या अनुभवी खेळाचं प्रदर्शन करत चढाईत १० गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे सुरजीत सिंहला सामन्यात एकही गुण कमावता आला नाही, तरीही बचावपटूंच्या जोरावर सामन्यात वझीरने हरियाणाचं आव्हान सामन्यात कायम राखलं. कर्णधार सुरिंदरने सामन्यात बचावात ५ तर मोहीत छिल्लरने २ बळी मिळवले.

जयपूरच्या संघानेही आज चांगला खेळ केला. पवन कुमार-तुषार पाटील या जोडगोळीने आज सामन्यात चढाईत १५ गुणांची कमाई केली. कर्णधार मनजीत छिल्लरनेही अष्टपैलू खेळ करत ४ गुणांची कमाई करत आपल्या चढाईपटूंना चांगली साथ दिली. मात्र मोक्याच्या क्षणी इतर बचावपटूंचा योग्य पाठींबा न मिळाल्याने जयपूरला पराभवाचा सामना करावा लागला.

या विजयासह अ गटात हरियाणा संघाने गुणतालिकेत आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 10:09 pm

Web Title: pro kabaddi season 5 hariyana stealers beat jaipur pink panthers maintain their second position in league table
टॅग : Pro Kabaddi Season 5
Next Stories
1 २६ वर्षानंतर ईडन गार्डन्सने अनुभवली ‘वन-डे’ हॅटट्रिक
2 ऑस्ट्रेलियानं दंगा केला, तरीही हार्दिक पांड्या नाबाद ठरला!
3 भारतीय हॉकीसंघ सर्वात भक्कम, पाकिस्तान प्रशिक्षकांची कबुली
Just Now!
X