News Flash

Pro Kabaddi 7 : बंगालची घौडदौड सुरुच, तामिळ थलायवाजवर केली मात

बंगाल गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर

प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामात बंगाल वॉरियर्सने आपलं विजयी अभियान कायम राखलं आहे. नवी दिल्लीच्या त्यागराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तामिळ थलायवाजवर ३५-२६ ने मात केली. बचावफळीचं अपयश आजच्या सामन्यात तामिळ थलायवाजला चांगलंच भोवलं.

बंगालच्या संघाने अष्टपैलू खेळ केला. के. प्रपंजन आणि मणिंदर सिंह यांनी चढाईमध्ये तामिळ थलायवाजच्या संघाचे कच्चे दुवे हेरून काढले. प्रपंजनने सामन्यात चढाईमध्ये १० तर मणिंदर सिंहने ९ गुणांची कमाई केली. तामिळ थलायवाजचे अनुभवी बचावपटू या जोडगोळीवर अंकुश ठेवू शकले नाहीत. ज्याचा फायदा घेत बंगालने सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं.

तामिळ थलायवाजकडून कर्णधार अजय ठाकूरने एकाकी झुंज दिली. भरवशाचा राहुल चौधरीही या सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. शब्बीर बापूने अजयला चांगली झुंज दिली, तामिळ थलायवाजच्या बचावफळीनेही आज पुरती निराशा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2019 8:58 pm

Web Title: pro kabaddi season 7 bengal warriors beat tamil thalaivas psd 91
Next Stories
1 राष्ट्रीय क्रीडा दिन : पॅरालिम्पिकपटू दिपा मलिक खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
2 भारत अ संघाची दक्षिण आफ्रिका अ संघावर मात
3 “रहाणेने शतक झळकावत स्वत:ला सिद्ध केलं”
Just Now!
X