25 February 2021

News Flash

आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक फुटबॉल स्पर्धा : युनायटेडला नमवून पीएसजी विजेता

इंग्लिश प्रीमिअर लीगच्या यंदाच्या सत्रापूर्वी अमेरिकेत दाखल झालेल्या मँचेस्टर युनायटेड क्लबला पराभवाने निरोप घ्यावा लागला.

| July 31, 2015 12:50 pm

इंग्लिश प्रीमिअर लीगच्या यंदाच्या सत्रापूर्वी अमेरिकेत दाखल झालेल्या मँचेस्टर युनायटेड क्लबला पराभवाने निरोप घ्यावा लागला. फ्रान्सच्या पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबने २-० अशा फरकाने युनायटेडचा पराभव करून आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्स चषक पटकावला. ब्लेंस माटुइडी आणि झलटान इब्राहिमोव्हिक यांनी प्रत्येकी एक गोल करून विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
क्लब अमेरिका, सॅन जास अर्थक्विक आणि युरोपियन विजेत्या बार्सिलोनाचा पराभव करणारा युनायटेड क्लब १०० टक्के विजयाची नोंद करण्यासाठी प्रयत्नशील होता. मात्र, पीएसजीने त्यांचे हे स्वप्न धुळीस मिळवले.  २२व्या मिनिटाला जुआन माटाने गोल केला, परंतु पंचांनी तो ऑफ साइड ठरविल्याने युनायटेडची जल्लोष करण्याची संधी गेली. तीन मिनिटांच्या आतच पीएसजीकडून माटुइडीने युनायटेडची बचावफळी भेदून अप्रतिम गोल केला. ३४व्या मिनिटाला झलटानने गोल करून पीएसजीची आघाडी २-० अशी मजबूत केली. मध्यंतरानंतरही पीएसजीने आपला झंझावाती खेळ कायम राखत सामन्यावरील पकड मजबूत करताना विजय निश्चित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 12:50 pm

Web Title: psg beat manchester united in chicago
Next Stories
1 बांगलादेश ८ बाद २४६; स्टेन, डय़ुमिनी चमकले
2 टेनिस : युकीची विजयी सलामी
3 पेटीएम कंपनीला बीसीसीआयचे प्रायोजकत्व
Just Now!
X