14 December 2018

News Flash

पूनम राऊतकडे भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व

एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिकाही होणार आहे.

मुंबईत १५ ते १९ ऑक्टोबरदरम्यान ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध रंगणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला अ संघाचे नेतृत्व पूनम राऊत हिच्याकडे सोपविण्यात आले आहे.  एकदिवसीय मालिकेनंतर टी-२० मालिकाही होणार आहे. मात्र टी-२० मालिकेसाठी नंतर संघाची घोषणा करण्यात येईल.

भारत अ महिला संघ : पूनम राऊत (कर्णधार), प्रिया पूनिया, देविका वैद्य, मोना मेश्राम, तनुश्री सरकार, सुषमा वर्मा, राजेश्वरी गायकवाड, सुश्री दिब्यादर्शिनी, सी. प्रत्युषा, रिमालक्ष्मी ईक्का, शिखा पांडे, नेत्रा एल., हेमाली बोरवणकर, कविता पाटील, प्रीती बोस.

First Published on October 12, 2018 2:26 am

Web Title: punam raut to lead india a series against australia a