News Flash

पी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ विमानातून भरारी

बंगळुरुतील एअर शोमध्ये घेतला सहभाग

भारताची आघाडीची बँडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने बंगळुरुत सुरु असलेल्या ‘एरो इंडिया, एअर शो’ मध्ये सहभाग घेतला. यावेळी सिंधूने भारतीय हवाईदलाच्या खात्यात नुकत्याच दाखल झालेल्या ‘तेजस’ विमानातून उड्डाणही केलं. यावेळी अनेक मान्यवर येथे उपस्थित होते. हवाई दलात महिला सैनिकांनी केलेल्या उत्तम कामगिरीचा गौरव करण्यासाठी सिंधूची तेजस विमानातून उड्डाण करण्यासाठी निवड करण्यात आली.

हिंदुस्थान एरोनॉटीकल लिमीटेड कंपनीद्वारे बनवण्यात आलेलं तेजस विमान नुकतच सर्व सोपस्कार पार पाडून हवाई दलाच्या खात्यात सहभागी झालं आहे. या विमानामुळे हवाई दलाच्या ताकदीत अजुन भर पडणार असल्याचं मत अनेक संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. काही दिवसांपूर्वी भारताचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनीही तेजस विमानातून उड्डाण केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:22 pm

Web Title: pv sindhu fly indigenous combat aircraft tejas at bengaluru air show
टॅग : Pv Sindhu
Next Stories
1 ….तर भारतीय संघ विश्वचषकात खेळणार नाही – प्रशिक्षक रवी शास्त्री
2 बीसीसीआयचं वागणं बालिशपणाचं, जावेद मियांदादची टीका
3 इशान किशनचा विक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक-कर्णधार
Just Now!
X