News Flash

रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदी बेनिटेझ; उपाध्यक्षांचे स्पष्ट संकेत

कार्लो अँसेलोटी यांच्या हकालपट्टीनंतर रिअल माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकपदाची धुरा कोणाकडे सोपविण्यात येईल यावर अनेक चर्चा रंगल्या.

| June 1, 2015 01:50 am

कार्लो अँसेलोटी यांच्या हकालपट्टीनंतर रिअल माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकपदाची धुरा कोणाकडे सोपविण्यात येईल यावर अनेक चर्चा रंगल्या. त्यात राफेल बेनिटेझ यांचे नाव आघाडीवर होते आणि रविवारी माद्रिदचे उपाध्यक्ष एडुआडरे फर्नाडेझ डे ब्लास यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. जगातील सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून बेनिटेझ यांच्या नावाचा उल्लेख करताना ब्लास यांनी प्रशिक्षकपदासाठी त्यांची नियुक्ती करण्याचा माद्रिदचा हेतू असल्याचे सांगितले.अँसेलोटी यांच्या कारकीर्दीवर नाराजी व्यक्त करताना माद्रिदने त्यांना पदावरून हटविले होते. त्याच दरम्यान बेनिटेझ यांचे नाव पुढे आले. नापोली क्लबच्या प्रशिक्षकपदावर असलेल्या बेनिटेझ यांनी गेल्या आठवडय़ात पदाचा राजीनामा दिल्याने या चर्चेला पाठबळ मिळाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 1:50 am

Web Title: rafael benitez real madrid trainer
टॅग : Real Madrid
Next Stories
1 बार्सिलोना अजिंक्य
2 आर्सेनलचे एफए चषकावर नाव
3 सेरेनाचा संघर्षमय विजय
Just Now!
X