News Flash

द्रविड भारताचा प्रशिक्षक म्हणून योग्य – पॉन्टिंग

द्रविड हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, असे पॉन्टिंग पुढे म्हणाला.

राहुल द्रविडकडे क्रिकेटचे सखोल ज्ञान आहे. त्याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. कसोटी, एकदिवसीय तसेच ट्वेन्टी-२० प्रकाराची चांगली जाण आहे. या सर्व मुद्यांचा विचार करता द्रविड हा भारतीय संघाचा प्रशिक्षक म्हणून योग्य आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने व्यक्त केले. कर्णधार विराट कोहलीची भूमिकाही प्रशिक्षक निवडीत महत्त्वाची आहे. मात्र द्रविड हा भारतासाठी सर्वोत्तम पर्याय आहे, असे पॉन्टिंग पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2016 5:09 am

Web Title: rahul dravid is perfect for indias coach says ricky ponting
टॅग : Ricky Ponting
Next Stories
1 रिओ ऑलिम्पिक निवडीसाठी सुशील कुमारची हायकोर्टात धाव
2 युवराजने घेतली कर्करोगग्रस्त मुलांची भेट
3 मुंबईच्या विजयात कृणाल चमकला
Just Now!
X