01 March 2021

News Flash

राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी

संजू सॅमसनची झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसनची साथ यामुळे राजस्थान

| September 22, 2013 04:51 am

संजू सॅमसनची झुंजार फलंदाजी आणि त्याला मिळालेली अजिंक्य रहाणे आणि शेन वॉटसनची साथ यामुळे राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या सहाव्या मोसमातील विजेत्या मुंबई इंडियन्सवर सलामीच्या लढतीत सात विकेट्सनी मात केली आणि चॅम्पियन्स लीग क्रिकेट स्पध्रेत विजयी सलामी नोंदवली.
मुंबईचे १४३ धावांचे आव्हान पार करताना दुसऱ्याच षटकांत राजस्थानचा कर्णधार राहुल द्रविड (१) बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर रहाणे आणि सॅमसन यांनी किल्ला लढवत दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भर घातली. रहाणेने ३३ तर सॅमसनने ५४ धावांची खेळी केली. २४ चेंडूंत ३३ धावांची आवश्यकता असताना वॉटसन आणि स्टुअर्ट बिन्नी (प्रत्येकी नाबाद २७) यांनी शानदार खेळी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.
रोहित शर्मा (४४) आणि किरॉन पोलार्ड (४२) यांच्या उपयुक्त योगदानामुळे मुंबईने ७ बाद १४२ धावा उभारल्या होत्या. कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा खेळणारा सचिन तेंडुलकर १५ धावा काढून माघारी परतला. त्यानंतर रोहितने पोलार्डसह पाचव्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी रचून मुंबईच्या डावाला आकार दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 4:51 am

Web Title: rajasthan royals cruise to win in champions league twenty20 opener
Next Stories
1 युवराज, राहुलचे वर्चस्व
2 टायटन्ससमोर चेन्नईचे आव्हान
3 कमकुवत संघांमधील मुकाबला
Just Now!
X