News Flash

सामनानिश्चिती प्रकरणाचा रिकी पॉन्टिंग साक्षीदार

केर्न्‍सविरुद्ध येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पॉन्टिंगची साक्ष झाली.

न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस केर्न्‍सने ज्यावेळी कर्णधार ब्रॅन्डन मॅक्क्युलमला सामनानिश्चितीबाबत विचारले होते त्या वेळी मी उपस्थित होतो, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने सांगितले.
केर्न्‍सविरुद्ध येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात पॉन्टिंगची साक्ष झाली. या प्रकरणाबाबत त्याने सांगितले की, ‘‘२००८ मध्ये भारतात मी मॅक्क्युलमसमवेत कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळत होतो. त्यावेळी आम्ही हॉटेलच्या एकाच खोलीत राहत होतो. त्या वेळी मॅक्क्युलमला केर्न्‍सकडून दूरध्वनी आला. मात्र त्या वेळी हा दूरध्वनी व्यवसायाबाबत असल्याचे त्याने सांगितले आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केले. पाच मिनिटे त्यांचे संभाषण सुरू होते.’’
केर्न्‍सचे वकील ऑर्लान्डो पॉनवाल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले की, ‘‘हा दूरध्वनी नेमका कोणाचा होता हे कळू शकले नाही.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 2:35 am

Web Title: ricky ponting witnesses in match fixing case
टॅग : Ricky Ponting
Next Stories
1 इंडियन सुपर लीग : नाटय़मय लढतीत युनायटेडचा चेन्नईयनवर विजय
2 पाक पंच आलीम दर भारत-दक्षिण आफ्रि को मालिके पासून दूर
3 निवृत्तीचे ‘सेहवाग वादळ’!
Just Now!
X