07 August 2020

News Flash

Ind vs WI : ऋषभ पंत फॉर्मात परतला, अखेरच्या सामन्यात विक्रमी खेळीची नोंद

विराट कोहलीच्या साथीने पंतची अर्धशतकी खेळी

अखरेच्या टी-२० सामन्यात भारताने यजमान वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात केली. वेस्ट इंडिजने विजयासाठी दिलेलं १४७ धावांचं आव्हान भारताने ऋषभ पंत आणि विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. पंतने ४२ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ६५ धावा केल्या. आतापर्यंत कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करता आलेली नाहीये.

याचसोबत टी-२० क्रिकेटमध्ये २२ व्या वर्षाआधी दोन अर्धशतकं झळकावणारा ऋषभ पंत पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

विराट कोहलीनेही ऋषभ पंतला चांगली साथ दिली, ऋषभने ४५ चेंडूत ५९ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 8:45 am

Web Title: rishabh pant creates unique record against west indies in 3rd t20i psd 91
Next Stories
1 दडपण हाताळण्यातील परिपक्वतेमुळे यश!
2 भारताकडून खेळण्याचे गुरुनाथचे स्वप्न
3 कोहलीइतकाच स्मिथ सर्वोत्तम -लँगर
Just Now!
X