रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी २० च्या माध्यमातून ९० च्या दशकातील दिग्गज खेळाडूंना पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहण्याचे क्रिकेटप्रेमींचे स्वप्न पूर्ण झाले असे वाटत असतानाच एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, ब्रेट ली आदी दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी २० क्रिकेट स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एका हातात बाळ, दुसऱ्या हातात रॅकेट; सानिया मिर्झाचा ‘पॉवरफूल’ फोटो

 

रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी २० लीग या स्पर्धेतील उर्वरित सामने हे प्रेक्षकांसाठी बंद राहणार असल्याची माहिती काही स्रोतांकडून देण्यात आली आहे, तर काही स्रोतांकडून स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूमुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आयोजकांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आरोग्य मंत्रालयानं गर्दी टाळण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेचे उर्वरित सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला गेला होता. तसेच पुण्यातील सामने नवी मुंबईच्या डी वाय पाटीलला हलवले होते. त्यात संध्याकाळी ही स्पर्धाच रद्द झाल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त आहे.

Video : गोलंदाजाने तोडला स्टंप… फलंदाजही झाला अवाक

IPL 2020 : उच्च न्यायालयाचा BCCI ला दणका

खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर आयोजक ही स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करणार आहेत. या लीगचे उर्वरित सामने मे किंवा ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येतील, मात्र खेळाडू कधी उपलब्ध आहेत यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे मुथय्या मुरलीधरन, मार्वन अटापट्टू आणि रंगना हेराथ यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. अन्य परदेशी खेळाडूदेखील येत्या दोन दिवसांत मायदेशात परततील, अशी माहिती दिली जात आहे.