News Flash

रोनाल्डो, बेंझेमा तंदुरुस्त -झिदान

दाच्या हंगामात रोनाल्डोच्या नावावर ४७ गोल असून बेंझेमाने २७, तर गॅरेथ बेलने १८ गोल केले आहेत

मँचेस्टर सिटीविरुद्धच्या लढतीत खेळणार
युरोपियर फुटबॉल महासंघ अर्थात युएफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीच्या लढतीसाठी ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि करिम बेंझेमा तंदुरुस्त असल्यामुळे रिअल माद्रिद क्लबच्या चमूत चैतन्याचे वातावरण आहे. त्यामुळे बुधवारी मँचेस्टर सिटीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात हे दोघेही आघाडीपटू मैदानात उतरणार असल्याची माहिती माद्रिदचे प्रशिक्षक झिनेदीन झिदान यांनी दिली.
दुखापतीमुळे रोनाल्डो गेल्या आठवडय़ात रायो व्हॅलेकानोविरुद्धच्या लढतीत मैदानात उतरला नव्हता, तर या सामन्यात ४२व्या मिनिटाला पोटरीच्या दुखापतीमुळे बेंझेमाला मैदान सोडावे लागले होते, मात्र हे दोन्ही खेळाडू मंगळवारी माद्रिद संघासोबत मँचेस्टरमध्ये दाखल झाले असून त्यांनी कसून सरावही केला.
यंदाच्या हंगामात रोनाल्डोच्या नावावर ४७ गोल असून बेंझेमाने २७, तर गॅरेथ बेलने १८ गोल केले आहेत. त्यामुळे या त्रिकुटाच्या कामगिरीवर निकाल अवलंबून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2016 6:55 am

Web Title: ronaldo benzema fit to face man city in champions league semis says zidane
टॅग : Ronaldo
Next Stories
1 आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : सायना, सिंधूवर भारताच्या आशा
2 अधिक भारतीय फुटबॉलपटूंना संधी मिळावी
3 सीरी ए फुटबॉल स्पर्धा : ज्युव्हेंट्स क्लबच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब
Just Now!
X