News Flash

Sachin A Billion Dreams: ‘सचिनच्या स्वप्नांचा प्रवास बिलियन लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल’

ग्रेट व्यक्तिची ग्रेट स्टोरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या स्वप्नांचा प्रवास शुक्रवारी प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या चित्रपटातून सचिनच्या आतापर्यंत गूढ राहिलेल्या काही गोष्टी त्याच्या चाहत्यांना समजतील, अशी चर्चा आहे. क्रिकेट चाहत्यांना सचिनच्या चित्रपटाची उत्सुकता दिसून येत असताना अशीच उत्सुकता भारतीय क्रिकेट खेळाडूंमध्येही पाहायला मिळाली. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रिमियर शोला भारतीय संघातील खेळाडूंनी हजेरी लावली होती. इंग्लड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सचिनच्या स्वप्न प्रवास अनुभवण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसह मुंबईकर अजिंक्य रहाणे यांच्यासह भारतीय संघातील अन्य खेळाडूंनी ‘सचिन : अ बिलियन ड्रीम्स’च्या प्रिमियरला हजेरी लावली होती.

हा चित्रपट पाहिल्यानंतर भारतीय युवा खेळाडूंनी चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या. भारतीय संघातील भरवशाचा खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या अजिंक्य रहाणेने चित्रपटानंतर ट्विटरवरुन सचिनचे आभार मानले. अजिंक्यने लिहिलंय की, प्रत्येक भारतीयाला प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद!

Sachin A Billion Dreams VIDEO : प्रिमियरमध्ये कलाकारांच्या मांदियाळीतही सचिनचे सारावरच लक्ष

के एल राहुलने सचिनच्या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना ट्विटरवर लिहलंय की, चित्रपट खूपच चांगला आहे. तुम्ही माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी आहात. तुमचा हा चित्रपट बिलियन लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल. चित्रपटामुळे सचिन सरांच्या गूढ गोष्टी जाणून घेता आल्या. हा चित्रपट म्हणजे ग्रेट व्यक्तिची ग्रेट स्टोरी असल्याचे भुवनेश्वर कुमारने म्हटले आहे. भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवननेही ट्विटरच्या माध्यमातून चित्रपटाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. चित्रपट फारच आवडल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच सचिनची प्रत्येक भेट ही खूपच प्रेमळ असते, असे त्याने लिहिले आहे.

विराट-अनुष्कासोबत टीम इंडियाने पाहिला ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 11:15 am

Web Title: sachin a billion dreams movie review by the indian cricket team
Next Stories
1 हा माझ्या मनातील घडामोडींचा चित्र-पट!
2 ‘एक राज्य, एक मत’ निर्णयाने झोप उडवली
3 भारत बाद फेरीसाठी पात्र
Just Now!
X