26 February 2021

News Flash

सचिनच्या हातच्या वडापावची चवच न्यारी, खास मित्र पुन्हा आला भेटायला

सचिनने इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ...

मुंबईत वडापाव आवडत नाही असा व्यक्ती शोधणं जरा कठीणच आहे. श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना वडापावची चव आवडते. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि मुंबईकर सचिनही वडापावचा चाहता आहे. काही दिवसांपूर्वी सचिनने आपल्या घरी वडापावचा बेत आखला होता. इतकच नव्हे तर वडापाव खाण्यासाठी एक खास अनपेक्षित पाहुणाही त्याच्या घरी आला होता. सचिनने हा फोटो इन्स्टावर पोस्ट केला होता.

अवश्य वाचा – सचिनच्या घरी वडा-पाव खायला आला खास पाहुणा, पाहा PHOTO

हा पाहुणा दुसरा तिसरा कोणीही नसून सचिनच्या घराजवळ राहणारं एक मांजर होतं. यानंतर काही दिवसांनी पुन्हा एकदा हे मांजर सचिनच्या घरी आलं आहे. या मांजरीसोबत खेळतानाचा एक व्हिडीओ सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. ज्यात गमतीत सचिनने कदाचीत माझ्या वडापाव ची आठवण आल्यामुळे हा नवीन मित्र परत भेटायला आला असेल असं म्हटलंय.

 

View this post on Instagram

 

My new friend is back! Looks like he’s missing the Vada Pav from the last visit.

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

काही दिवसांपूर्वी सचिनने आपल्या लग्नाचा २५ वा वाढदिवसदेखील छान साजरा केला होता. लॉकडाउन काळात नेहमीसारखं सेलिब्रेशन करता आलेलं नसलं, तरीही आपली पत्नी अंजली व घरातील इतरांना खुश करण्यासाठी सचिनने खास बेत आखला होता. आंब्याचा हंगाम सुरु असल्याने सचिनने एका खास पद्धतीने आंबा कुल्फी तयार केली. आपल्या या खास रेसिपीचा व्हिडीओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 2:22 pm

Web Title: sachin new friend came to his house once again sachin posted video with new friend on social media psd 91
Next Stories
1 शोएब अख्तरला पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा दणका
2 श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा: हसीन जहाँची उच्च न्यायालयात याचिका
3 लीग-१ फुटबॉल : नेयमारसह पाच जणांना लाल कार्ड
Just Now!
X