आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतरही सचिन तेंडुलकर जगभरातील कोट्यवधी चाहत्यांच्या मनात आपली जागा कायम राखून आहे. निवृत्तीनंतर सचिन सध्या आपल्या अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि अनेक सामाजिक कार्यांमध्ये व्यस्त असतो. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सचिनने राजस्थानमधील शोले चित्रपटाच्या शुटींग लोकेशनला भेट दिली. यावेळी सचिनसोबत त्याचा मुलगा अर्जुन आणि मित्रपरिवारही हजर होता.

 

View this post on Instagram

 

Kitne Aadmi The? It was a complete Sholay experience. Ek photo toh banta hai. #rajasthantales

A post shared by Sachin Tendulkar (@sachintendulkar) on

सचिनने इन्स्टाग्रामवर आपल्या या भेटीचा फोटो शेअर करत, गब्बर सिंहचा कितने आदमी थे? हा डायलॉग फोटोच्या कॅप्शनमध्ये टाकला आहे. अर्जुन तेंडुलकरने नुकतीच मुंबईकडून कुचबिहार करंडकात धडाकेबाज कामगिरीची नोंद केली आहे. दिल्लीविरुद्ध सामन्यात अर्जुनने 5 बळी घेतले.