06 July 2020

News Flash

सायना, कश्यपची विजयी सलामी

यंदाच्या वर्षांतल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सायना नेहवालने चीन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली

| November 14, 2013 04:28 am

यंदाच्या वर्षांतल्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सायना नेहवालने चीन सुपर सीरिज प्रीमिअर बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सायनाच्या बरोबरीने पारुपल्ली कश्यपने विजयी सुरुवात केली. सहाव्या मानांकित सायनाने जपानच्या नोझोमीवर सरळ गेम्समध्ये २१-१४, २१-१९ अशी मात करत दुसऱ्या फेरीत आगेकूच केली.  पुढील फेरीत सायनाचा मुकाबला चीनच्या स्युन युशी होणार आहे.
कश्यपने थायलंडच्या बूनसुक पोनसन्नावर २२-२०, २१-१५ असा विजय मिळवला. अन्य लढतींमध्ये नागपूरकर अरुंधती पनतावणेने जपानच्या इरिको हिरोसेला २१-१४, २१-१८ असे नमवले. मुंबईकर आनंद पवार आणि अजय जयराम यांना पराभवाला सामोरे जावे लागले. जपानच्या ताकुमा उइडाने आनंदवर १८-२१, २१-१०, २१-११ अशी मात केली तर कोरियाच्या वान हो सोनने अजय जयरामवर २१-१८, २१-१९ असा विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2013 4:28 am

Web Title: saina nehwal parupalli kashyap wins at china open
Next Stories
1 निवृत्तीनंतर विस्मरणात जाईल -मियाँदाद
2 सट्टेबाजारही ‘सचिन’मय
3 आता क्रिकेट चैतन्यहीन होणार!
Just Now!
X