कॅरेबियन बेटांवर २८ जूनपासून सुरू होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या तीन सामन्यांसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला असून, अनुभवी फलंदाज रामनरेश सरवान याला वगळण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजने १३ सदस्यीय संघ जाहीर करताना इंग्लंडच्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंपैकी फक्त वेगवान गोलंदाज जेसन होल्डन आणि फलंदाज रामनरेश सरवान यांना वगळले आहे. तब्बल १८ महिन्यांनी सरवानचा वेस्ट इंडिज संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याला पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या सामन्यात प्रत्येकी एकेक धाव काढता आली होती.
तिरंगी स्पध्रेसाठी ड्वेन ब्राव्होकडेच नेतृत्वाची धुरा सोपविण्यात आली आहे. चॅम्पियन्स करंडकस्पर्धेत वेस्ट इंडिजला साखळीचा अडसर पार करता आला नव्हता. साखळीमध्ये ते पाकिस्तानविरुद्ध जिंकले होते, तर दक्षिण आफ्रिका आणि भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.