भारताच्या सौरव घोषाल याला विंडी सिटी स्क्वॉश स्पध्रेत २-१ अशा आघाडीवरून जागतिक अव्वल मानांकित खेळाडू महंमद अल शोर्बगी याच्याविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागले.
या विजयाबरोबर मोहम्मद याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़  इजिप्तच्या महंमद याने हा सामना ११-५, ४-११, १-११, ११-५, ११-७ असा जिंकला. सौरव याला गतवर्षी इजिप्तमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही अव्वल मानांकित खेळाडू ग्रेगरी गॉल्टियरविरुद्ध असाच पराभव स्वीकारावा लागला होता. त्यावेळी त्याला चौथ्या व पाचव्या गेममध्ये स्वत:च्या खेळावर नियंत्रण ठेवता आले नाही. या स्पर्धेतील पहिल्या फेरीत त्याने मॅक्स ली याच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता.