News Flash

पाकिस्तानच्या कर्णधारपदासाठी मकसूद व आलम शर्यतीत

विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हक व अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी यांनी एक दिवसीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

| March 22, 2015 01:11 am

विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार मिसबाह उल हक व अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी यांनी एक दिवसीय सामन्यांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपद रिक्त झाले असून यासाठी शोहेब मकसूद व फवाद आलम उत्सुक आहेत.  
पाकिस्तान क्रिकेट मंडळामधील एका विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार कामरान अकमल व शोएब मलिक यांच्या पुनरागमनाची शक्यता कमी आहे. साहजिकच सद्यस्थितीत शोहेब व फवाद यांच्यापैकी एकाची कर्णधारपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. मिसबाह व आफ्रिदी यांनी देशासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक करीत मंडळाचे अध्यक्ष शहरियार खान यांनी या खेळाडूंना सन्मानपूर्वक निरोप दिले जातील, असे जाहीर केले आहे. तसेच युनिस खानवरही निवृत्तीसाठी दबाव आणला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 1:11 am

Web Title: sohaib maqsood fawad alam in line for pakistan odi captaincy
Next Stories
1 पुढील वर्षी विश्व अजिंक्यपदासाठी आनंद उत्सुक
2 कर्नाटकने जेतेपद राखले
3 सायना व कॅरोलीना यांच्यात पुन्हा लढत होण्याची शक्यता
Just Now!
X