18 November 2017

News Flash

सोमदेवची कुनित्सिनवर मात

भारताचा अव्वल टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने दुबई डय़ुटी फ्री टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या

पीटीआय, दुबई | Updated: February 26, 2013 7:28 AM

भारताचा अव्वल टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने दुबई डय़ुटी फ्री टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रशियाच्या इगोर कुनित्सिन याचा सरळ सेटमध्ये पराभव करून दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे.
जागतिक क्रमवारीत ३१५व्या स्थानी असलेल्या सोमदेवला कुनित्सिनचा ६-१, ६-४ असा पाडाव करण्यासाठी एक तास लागला. आता दुसऱ्या फेरीत सोमदेवची गाठ सायप्रसचा मार्कस बघदातिस आणि अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोट्रो यांच्यातील विजेत्याशी होईल. जागतिक क्रमवारीत १६७व्या स्थानी असलेल्या कुनित्सिनविरुद्ध सोमदेवने सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. चार वेळा प्रतिस्पध्र्याची सर्विस भेदून सोमदेवने पहिला सेट ६-१ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये ३-३ अशा बरोबरीनंतर सोमदेवने पुन्हा एकदा कुनित्सिनची सर्विस मोडीत काढली. त्यामुळे त्याने ६-४ अशा फरकाने दुसऱ्या सेटसह सामना जिंकला.

First Published on February 26, 2013 7:28 am

Web Title: somdev devvarman beats kunitsyn to enter 2nd round of dubai event