स्पेनकडून इटलीचा पाडाव; विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धा

पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रतेसाठी स्पेनने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. इस्कोच्या दुहेरी धमाक्याला अल्व्हारो मोराटाने अखेरच्या क्षणी झळकावलेल्या गोलची साथ मिळाली. त्यामुळे सांतियागो बेर्नाबेयू येथे झालेल्या सामन्यात स्पेनने बलाढय़ इटलीचा ३-० असा पाडाव केला.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
Big blow to England team before World Cup 2024
T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

स्पेनने सांघिकदृष्टय़ा अप्रतिम खेळाचे प्रदर्शन केले, मात्र इस्कोने आपल्या सहजसुंदर कामगिरीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. १४व्या मिनिटाला त्याने फ्री-किकद्वारे गोल करून स्पेनचे खाते उघडले. मग पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात ४०व्या मिनिटाला त्याने दुसरा गोल नोंदवला. मग ७७व्या मिनिटाला मोराटाने तिसरा गोल साकारला.

‘‘इस्कोने पहिल्याच सत्रात दोन गोल झळकावल्यामुळे स्पेनला सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित करता आले,’’ अशी प्रतिक्रिया स्पेनचे प्रशिक्षक ज्युलेन लोपेटेगुई यांनी व्यक्त केली.

२००६ नंतर विश्वचषक पात्रता स्पर्धेत इटलीचा संघ प्रथमच पराभूत झाला आहे. त्यामुळे युरोपियन विभागातील पात्रतेच्या ग-गटात स्पेनचा संघ आघाडीवर पोहोचला आहे. तीन सामने शिल्लक असताना स्पेनचा संघ इटलीपेक्षा तीन गुणांनी आघाडीवर आहे. याचप्रमाणे गोलफरकामध्येही स्पेनने आघाडी राखली आहे. इटलीला मात्र दोन टप्प्यांच्या ‘प्ले-ऑफ’चा अडथळा ओलांडावा लागण्याची शक्यता आहे.

‘‘विश्वचषकाच्या दृष्टीने अतिशय मेहनत घ्यायची, हेच लक्ष्य आम्ही स्वत:पुढे ठेवले आहे. विश्वचषकातही स्पर्धात्मक खेळाचे प्रदर्शन आम्ही करू. स्पेनविरुद्धच्या सामन्यात तंत्र आणि मेहनत यात आम्ही कमी पडलो,’’ अशी कबुली इटलीचे प्रशिक्षक गियामपियरो व्हेंटुरा यांनी सांगितले. २०१६मध्ये झालेल्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इटलीने स्पेनचा २-० असा पराभव केला होता.