News Flash

स्पेनचा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया निवृत्त

व्हियाने बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि व्हॅलेंसिया या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केले

(संग्रहित छायाचित्र)

स्पेनसाठी सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिया याने बुधवारी आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ३७ वर्षीय व्हिया पुढील महिन्यात जे-लीगच्या मोसमाअखेरीस आपल्या १९ वर्षांच्या कारकीर्दीला अलविदा करणार आहे.

व्हियाने बार्सिलोना, अ‍ॅटलेटिको माद्रिद आणि व्हॅलेंसिया या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केले. याचप्रमाणे स्पेनसाठी तो ९८ सामने खेळला आहे. ‘‘माझ्या व्यावसायिक कारकीर्दीचा समारोप करण्याचे मी ठरवले आहे. निवृत्तीविषयी मी बऱ्याच महिन्यांपासून विचार करत होतो. माझे कुटुंबीय तसेच जवळच्या व्यक्तींशी चर्चा करूनच मी हा निर्णय घेतला आहे,’’ असे व्हियाने सांगितले.

‘‘यापुढे मी मैदानावर जाऊन फुटबॉल खेळणार नसलो तरी अन्य मार्गाद्वारे फुटबॉलशी जोडला जाणार आहे. फुटबॉलविश्वात योगदान देण्याचा माझा यापुढेही प्रयत्न राहील,’’ असे व्हिया म्हणाला. न्यूयॉर्कमधील एका फुटबॉल लीग स्पर्धेसाठी व्हियाने क्विन्सबोरो एफसी या फ्रँचायझीमध्ये गुंतवणूक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 1:16 am

Web Title: spanish footballer david villa retires abn 97
Next Stories
1 ‘गुलाबी वातावरणात’ भारताचे पारडे जड
2 २०२२च्या राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश नाहीच!
3 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला नवीन गोलंदाज
Just Now!
X