News Flash

VIDEO: क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड आणि मेरी कोम यांचं बॉक्सिंग पाहिलंत?

दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमध्ये या दोघांमध्ये फ्रेंडली बॉक्सिंग झाले, हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे

फोटो सौजन्य ANI

केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड आणि बॉक्सिंगपटू मेरी कोम यांच्या बॉक्सिंगचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत पाचवेळा जग्गजेता असा किताब मिळवणारी मेरी कोम आणि राज्यवर्धन राठोड बॉक्सिंग करत होते. थोडीशी गंमत म्हणूनच या दोघांमध्ये हा खेळ रंगला. दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमध्ये या दोघांमध्ये फ्रेंडली बॉक्सिंग झाले. राज्यवर्धन राठोड मेरी कोमच्या पंचपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. तिचा पंच चुकवण्याचा प्रयत्न करताना दिसत होते आणि मेरी कोम त्यांना पंच मारण्याची संधी शोधत होती. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतो आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनेही हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

मेरी कोम ही भारतातील प्रसिद्ध बॉक्सिंगपटू आहे. तिच्या आयुष्यावर सिनेमाही आला होता. ज्यात अभिनेत्री प्रियांका चोप्राने मेरी कोमची व्यक्तीरेखा साकारली होती. सध्या मेरी कोम ३५ वर्षांची आहे. वरिष्ठ खेळाडूंमध्ये सुवर्ण पदकांची कमाई करणारी ती एकमेव बॉक्सिंगपटू आहे. २०२० च्या ऑलिम्पिकपर्यंत मी खेळणारच असे तिने जाहीर केले आहे. तिचा आणि राज्यवर्धन राठोड यांचा व्हिडीओ, त्यांच्यातले फ्रेंडली बॉक्सिंग हे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होते आहे. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणातला हा व्हिडीओ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 11:23 pm

Web Title: sports minister rajyavardhan singh rathore in a friendly boxing bout with boxing champion mary kom at indira gandhi stadium in delhi
Next Stories
1 Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा विजयाने शेवट, बंगाल वॉरियर्सवर मात
2 Ind vs WI : अंतिम सामन्यात नोंदवलेले हे ११ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का?
3 VIDEO: पुन्हा दिसला द्रविडचा साधेपणा, मोठ्या स्क्रीनवर झळकताच अवघडला
Just Now!
X