न्यूझीलंड-श्रीलंका कसोटी मालिका

कोलंबो : पावसामुळे श्रीलंका-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फक्त ३६.३ षटकांचा खेळ होऊ शकला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या झुंजार फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने २ बाद ८५ धावा केल्या.

श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर सलामीवीर लाहिरु थिरिमानेने एक तास किल्ला लढवून फक्त दोन धावा करू शकला. ऑफ-स्पिनर विल्यम सोमव्हिलेने त्याला बाद केले. मग करुणारत्नेने कुशल मेंडिसच्या (३२) साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ५० धावांची भागीदारी केली. कॉलिन डी ग्रँडहोमने मेंडिसला बाद करीत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा करुणारत्ने ४९ धावांवर खेळत होता, तर अँजेलो मॅथ्यूजने आपले धावांचे खाते उघडलेले नाही.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका (पहिला डाव) : ३६.३ षटकांत २ बाद ८५ (दिमुथ करुणारत्ने खेळत आहे ४९, कुशल मेंडिस ३२; कॉलिन डी ग्रँडहोम १/१४)