करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. तब्बल ४ महिन्यांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली असली तरीही करोनामुळे अनेक महत्वाच्या मालिका रद्द केल्या जात असून काही मालिकांचं आयोजन पुढे ढकललं जात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड संघांचा भारत दौराही पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन वर्षात दोन्ही संघ भारतात मालिका खेळणार आहे.

परंतू भारतात सध्या करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, पुढील वर्षात या मालिकेचं आयोजन होण्याबद्दलही साशंकता आहे. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये आयोजित केला आहे. इंग्लंडविरुद्ध मालिकेबद्दल बीसीसीआय पुढील वर्षात निर्णय घेणार असलं तरीही गरज पडल्यास श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने भारत विरुद्ध इंग्लंड मालिका आयोजित करण्याची तयारी दाखवली आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमधला इंग्लंडचा भारत दौरा पुढे ढकलण्यात आला आहे

 

श्रीलंकेत करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. लंकन सरकारने देशातील बहुतांश भागातला लॉकडाउन आता उठवला आहे. तसेच श्रीलंकेतील शाळाही आता सुरु झाल्या आहेत. त्यामुळे नवीन वर्षात भारतामधली परिस्थिती न सुधारल्यास लंकेत कसोटी मालिकेचं आयोजन करण्याचा प्रस्ताव श्रीलंकेने दिला आहे. याआधी आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजनही श्रीलंकेत करण्याचा प्रस्ताव लंकन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला दिला होता.

अवश्य वाचा – निवृत्ती मागे घे आणि पुन्हा खेळ, ‘या’ संघाने दिली युवराज सिंहला ऑफर