News Flash

श्रीलंकेने मालिका जिंकली

श्रीलंकेने पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडवर सहा विकेट राखून मात करीत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-२ असे प्रभुत्व मिळवले.

| June 5, 2014 06:04 am

श्रीलंकेने पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात इंग्लंडवर सहा विकेट राखून मात करीत पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेवर ३-२ असे प्रभुत्व मिळवले. लसिथ मलिंगाच्या (५० धावांत ३ बळी) वेगवान माऱ्याच्या बळावर श्रीलंकेने इंग्लंडचा डाव फक्त २१९ धावांत गुंडाळला. मग श्रीलंकेची ३ बाद ६२ अशी अवस्था झाली होती. परंतु महेला जयवर्धने (५३), लाहिरू थिरिमाने (नाबाद ६०) आणि कप्तान अँजेलो मॅथ्यूजच्या (नाबद ४२) फलंदाजीच्या बळावर श्रीलंकेने १० चेंडू राखून आपला विजय साजरा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2014 6:04 am

Web Title: sri lanka win series amid controversial run out
Next Stories
1 बटलरला धावचीत करण्याचा निर्णय योग्यच -सेनानायके
2 आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताची तिसऱ्या स्थानावर घसरण
3 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : शारापोव्हा उपांत्य फेरीत
Just Now!
X