सीन अबॉट सवरेत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू
गेल्या वर्षभरात सातत्यपूर्ण प्रदर्शनासह ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्टीव्हन स्मिथला अ‍ॅलन बॉर्डर पुरस्काराने गौरवण्यात आले. वर्षांतील सवरेत्कृष्ट क्रिकेटपटू, सवरेत्कृष्ट कसोटी खेळाडू आणि सवरेत्कृष्ट एकदिवसीय खेळाडू अशा तिन्ही पुरस्कारांवर स्मिथने आपली मोहोर उमटवली. अ‍ॅलन बॉर्डर पुरस्कारासाठी नामांकित डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल जॉन्सन यांना मागे टाकत स्मिथने बाजी मारली. तिन्ही पुरस्कारांवर कब्जा करणारा स्मिथ रिकी पाँटिंग आणि शेन वॉटसन यांच्यानंतरचा केवळ तिसरा खेळाडू ठरला आहे. सवरेत्कृष्ट ट्वेन्टी-२० पुरस्कारासाठी ग्लेन मॅक्सवेलची निवड करण्यात आली. ज्याच्या चेंडूवर फिलीप ह्य़ुजचा दुर्दैवी अपघात झाला त्या सीन अबॉटला ब्रॅडमन यांच्या नावाने देण्यात येणाऱ्या सवरेत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले