बेंगळूरु : कर्नाटक प्रीमियर लीग सामनानिश्चिती प्रकरणी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य सुधिंद्र शिंदे यांना बुधवारी अटक करण्यात आली आहे.  मुख्य गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी शिंदे यांची चौकशी केली होती. मग अनेक पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती बेंगळूरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी दिली. या लीगमधील बेळगावी पँथर्स संघाचे ते प्रशिक्षक होते. शिंदे यांनी अली अश्फाक तारा यांच्या साथीने काही सामन्यांची निश्चिती केली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.