जागतिक  कुस्ती स्पर्धा

जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताच्या सुमीत मलिकने उपांत्य फेरीत धडक मारत त्याच्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. मात्र सोनबा गोगानेला पराभव पत्करावा लागला.

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या सुमीतने १२५ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या इन्कार येरमुकांबेत याला ६-१ ने पराभूत केले. त्याआधी त्याने जपानच्या ताइकी यामामोटोवर ४-१ अशी मात केली होती. दरम्यान, राशीदोव्ह गाझीमुरादशीने गोगानेला १०-० असे हरवले.