04 December 2020

News Flash

एम. एस. के. प्रसादांचा वारसदार ठरला ! सुनिल जोशी नवे निवड-समिती प्रमुख

आफ्रिकेविरुद्ध मालिकेचा संघ निवडण्याची पहिली जबाबदारी

बीसीसीआयच्या निवड समिती-प्रमुख पदावर माजी फिरकीपटू सुनिल जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय क्रिकेट प्रशासकीय समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. ज्यात सुनिल जोशी आणि हरविंदर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. एम.एस.के.प्रसाद यांचा बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदावरचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता. व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन यासारखे उमेदवार या पदाच्या शर्यतीत होते. मात्र मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. नवीन निवड समितीसमोर आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्याचं पहिलं काम असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2020 5:06 pm

Web Title: sunil joshi will replace msk prasad as the chairman of the senior mens selection committee psd 91
टॅग Bcci
Next Stories
1 क्रीजवर नुसतं उभं रहायचं असेल तर धावा कोण करणार??
2 Video : बाबो… रागाच्या भरात फलंदाजाच्या डोक्यातून निघाल्या वाफा!
3 WT20 World Cup : भारत-इंग्लंड उपांत्य सामन्यात पावसाने व्यत्यय आणला तर काय होईल??
Just Now!
X