टीम इंडियाचा फलंदाज सुरेश रैना याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया पार पडली आहे. बीसीसीआयने ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याला गुडघेदुखीचा त्रास जाणवत होता. त्याचमुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. त्याला ४ ते ६ आठवडे आराम करावा लागणार आहे, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.

६ ऑगस्टलाच विराट कोहलीने T 20 सामन्यांमध्ये सुरेश रैनाचा धावांचा विक्रम मोडला. सुरेश रैनाच्या T20 सामन्यांमध्ये ८ हजार ३९२ धावा आहेत. विराट कोहलीने T20 सामन्यांमध्ये ८ हजार ४१६ धावा करत त्याचा हा रेकॉर्ड मोडला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून सुरेश रैनाला गुडघेदुखीचा त्रास होत होता. त्याचमुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सुरेश रैनाने टीम इंडियासाठी १८ टेस्ट, २२६ वनडे सामनेही खेळले आहेत. वन डे क्रिक्रेटमध्ये ३६ विकेटही सुरेश रैनाने घेतल्या आहेत. आता गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याला चार ते सहा आठवडे आराम करावा लागणार आहे.