काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवादी हल्ला झाला होता. यात भारताचे ४०हून जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर मंगळवारी १२ दिवसांनी भारताने पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली. भारतीय वायुसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हजार किलोचे बॉम्ब फेकले आणि तळ उध्वस्त केले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. या हल्ल्यात सुमारे ३०० ते ३५० दहशतवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Surgical Strike 2 : ‘चांगले वागतो म्हणून कमकुवत समजू नका!’; सचिनचा पाकला इशारा

भारतीय वायुसेनेच्या या कर्तृत्वामुळे सर्व स्तरातून वायुसेनेतील जवानांचे आणि भारत सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग तसेच फिरकीपटू युझवेन्द्र चहल यांनी याबाबत ट्विट करून जवानांचे कौतुक केले आहे, तसेच त्यांना सलाम केला आहे. यातच इतरही खेळाडूंनीही वायुसेनेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Surgical Strike 2 : ‘बहोत हार्ड!’; चहलचा भारतीय वायुसेनेला सलाम

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने ‘शानदार’ असं म्हणत वायुसेनेचे कौतुक केले आहे.

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने वायुसेनेला त्रिवार सलाम ठोकला आहे.

बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत यानेही या कामगिरीबाबत वायुसेनेला सलाम करत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो असे म्हटले आहे.

टेनिसपटू महेश भूपती यानेही जय हिंद म्हणत वायुसेनेला सलाम केला आहे.

हरभजन सिंगने भारतीय वायुसेनेचा अभिमान वाटतो असे ट्विट केले आहे.

Surgical Strike 2 वर सेहवाग म्हणतो ….

दरम्यान, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी लोक LOC चे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केल्याचे वृत्त मान्य केले आहे.