ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार हा २०१७ च्या अखेरीस डब्ल्यू. डब्ल्यू. ई. मध्ये जाण्याच्या शक्यता आहे. सुशील कुमारला यावर्षीच व्यावसायिक कुस्तीचा प्रस्ताव मिळाला होता. त्याने याआधी याबाबत विचार केला नव्हता परंतु आता मात्र तो या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचे वृत्त स्पोर्टस् कीडा या वेबसाइटने दिले आहे.

सुशील कुमारच्या निकटवर्तीयांपैकी एका व्यक्तीने ही माहिती दिल्याचे स्पोर्टस् कीडाने म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये व्यावसायिक कुस्ती खेळण्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. ई आणि टी.एन.ए.कडून सुशील कुमारला प्रस्ताव आले होते. परंतु, त्याने या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करित कुस्तीच्या सरावावरच लक्ष केंद्रित केले होते. या दोन्ही संघटनांनी सुशील कुमारकडे सातत्याने पाठपुरावा करीत खेळण्याची विनंती केली. त्यामुळेच २०१७ या वर्षामध्ये तो आपल्या व्यावसायिक कारकीर्दीस सुरुवात करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी म्हटले.

Paris Olympics Opening ceremony faces major changes
ऑलिम्पिक सोहळा पुन्हा स्टेडियममध्ये? सुरक्षेचा धोका असल्याची फ्रान्सच्या अध्यक्षांना भीती
australia church stabbing
ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा एकदा चाकूहल्ला; यावेळी चर्चमध्ये प्रार्थना सुरू असताना माथेफिरूचा हल्ला
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुशील कुमारची इच्छा होती परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. कदाचित त्याकारणानेच सुशील कुमारने व्यावसायिक कुस्तीच्या प्रस्तावाला उत्तर दिले नसेल. परंतु आता त्याच्या वयाची ३३ वर्षे पूर्ण झाली असून तो व्यावसायिक कुस्तीमध्ये उतरू शकतो.

भारतीय-अमेरिकन प्रेक्षकांना आपल्याकडे वळविण्यासाठी डब्ल्यू. डब्ल्यू. ईची मोर्चेबांधणी सुरू आहे. सुशील कुमारने जर व्यावसायिक कुस्ती खेळण्यास सुरुवात केली तर त्याची भारतातील लोकप्रियता पाहता येथील प्रेक्षकांना आकर्षित करणे सोपे होईल असा विचार देखील आयोजकांनी केला असल्याचे स्पोर्टस् कीडाने म्हटले आहे.

सुशील कुमारची निवड करण्यापूर्वी त्यांनी तब्बल ४० जणांचा विचार केला होता. सुशील कुमारची शैली आणि त्याचे खेळातील सातत्य पाहता तोच योग्य उमेदवार ठरू शकेल असे त्यांना वाटल्यामुळेच त्याला संधी मिळाल्याचे निकटवर्तीयाने म्हटले आहे. जर सुशील कुमार व्यावसायिक कुस्ती खेळला तर तो कर्ट अॅंगलप्रमाणे लोकप्रिय होईल असे डब्ल्यू. डब्ल्यू. ई. संघटनेला वाटते. सुशील कुमार सध्या दिल्लीच्या छत्रसाल मैदानात सराव करीत आहे.